अनधिकृत बांधकामप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । पाचगणी । पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या जागेत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोन महिलांच्या विरोधात पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

जुलेखा ईरफान टिनवाला ( रा. टोपीवाला 221, तिसरा मजला सरदार वल्लभ भाई पटेल रोड डोंगरी मुंबई) आणि मुबीन वाशिम मुंनशी ( राहणार फायनल प्लॉट नंबर 472 पाचगणी तालुका महाबळेश्वर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत.
याप्रकरणी पाचगणी नगरपालिकेचे नगर रचना सहाय्यक अमोल राजाराम पवार (वय 32) यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पाचगणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचगणी नगरपालिका हद्दीमधील कमीन्स स्कूलच्या समोर रोड लगतच्या परिसरात फायनल प्लॉट नंबर 472 टीपी स्कीम नंबर तीन या मिळकतीमध्ये मोकळ्या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम चालू असल्याची माहिती नगरपालिका अधिकाऱ्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचे आढळून आले. दरम्यान, पाचगणी नगरपालिकेचे नगर रचना सहाय्यक अमोल पवार यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार जुलेखा टिनवाला आणि मुबीन मुंनशी या दोन महिलांच्या विरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात 55/2022 महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 एम आर टी पी चे कलम 52.53.54 अन्वये व महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 चे कलम 18.93 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!