
स्थैर्य, सातारा, दि.०२: सातार्यातील कमानी हौद परिसरात दुकाने सुरु ठेवून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रमेश अशोक देशमुख (वय 40, रा. 98, गुरुवार पेठ, सातारा) याने मनिषा कांडप मशीन तर वीर हरुम सय्यद (वय 50, रा. 256, गुरुवार पेठ, बागेच्या पाठीमागे, सातारा) याने अजिंक्य इंटरप्रायजेस मिरची कांडप यंत्रण व पिठाची गिरणी चालू ठेवली होती. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई सोनाली भोसले यांनी तक्रार दिल्यानतंर रमेश देशमुख आणि वीर सय्यद या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत.