सशाची शिकार केल्याप्रकरणी सुर्याचीवाडीतील दोघांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, खटाव, दि. १८: सुर्याचीवाडी (ता.खटाव) येथे सशाची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने दोघांवर वनगुन्हा नोंद केला. केशव हणमंत सुर्वे (रा. पिंपरी) व अभिजीत परसराम वळकुंडे (रा. सुर्याचीवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत वनविभागाच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनातील माहितीनुसार, बुधवारी (ता.16) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वडूज, मायणी येथील वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी गस्त घालत असताना केशव सुर्वे व अभिजीत वळकुंडे हे दोघे शिकारी कुत्र्यांच्या मदतीने सशाची शिकार करून घरी जात असताना त्यांना एक मृत ससा व दुचाकी क्रमांक (एम.एच. 11 सीटी 6835) सह रंगेहाथ पकडले.

उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन वनगुन्हा नोंद करण्यात आला. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याकामी वनक्षेत्रपाल शितल फुंदे, वनपाल एम.जी. पाटील, रामदाव घावटे, संजीवनी खाडे यांनी काम पाहिले.


Back to top button
Don`t copy text!