दैनिक स्थैर्य । दि. ०५ मार्च २०२२ । सातारा । स्वत:च्या नावावर हप्त्याने मोबाईल घेवून देत त्या मोबाईलचे हप्ते न भरल्याचा राग मनात धरुन वाद झाला. या वादातून तिघांवर चाकूने वार करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान सोमवारपेठ, सातारा येथे घडली. याप्रकरणी अनिकेत विश्वास साळुंखे वय २५, रा. शाहूनगर याने तक्रार दिली आहे. यानंंतर विराज विनोद साळुंखे वय २२, रा. रामाचा गोट, सातारा, जय गायकवाड (पूर्ण नाव समजू शकले नाही) या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूनगरमध्ये राहत असलेला अनिकेत विश्वास साळुंखे याला विराज विनोद साळुंखे याने स्वत:च्या नावावर लोन करुन मोबाईल घेवून दिला होता. या मोबाईलचे हप्ते अनकेत भरणार होता परंतु त्याने हफ्ते न भरल्याने फायनान्स कंपनीकडून विराजला वारंवार हप्ते भरण्यास सांगण्यात येत होते. यामुळे विराज याने अनिकेतला साडेदहा वाजण्याच्या सुमारास फुटका तलाव येथे बोलावून हप्ते भरण्यास सांगितले. यावेळी जय गायकवाड हा ही सोबत होता. यावेळी दोघांच्यात शाब्दीक वादावादी होवून हाणामारी झाली यामधील जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर दोघांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी सहायक फौजदार भिसे हे तपास करीत आहेत.