विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा


स्थैर्य, सातारा, दि. 12 : महिलेचा विनयभंग करून तिला व तिच्या कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी नागठाणे (ता.सातारा) येथील तिघांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मधुकर बंडू ताटे,दिलीप बंडू ताटे व प्रदीप दिलीप ताटे (सर्व रा.नागठाणे, ता सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याची फिर्याद पीडित महिलेने दाखल केली आहे.

या प्रकरणी बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला व तिचा पती दिनांक ७ जून रोजी दुपारी २ च्या सुमारास नागठाणे  येथील मळवी नावाच्या शिवारात ट्रॅक्टरच्या साहाय्याने स्वतःच्या शेतातील चर मुजवत होती.या वेळी मधुकर ताटे यांनी तिथे येऊन संबंधित महिलेला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली तसेच महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून अश्लील शिवीगाळ केली.

यावेळी मधुकर ताटे यांनी भाऊ दिलीप ताटे व मुलगा  प्रदीप ताटे यांना बोलावून घेऊन संबधित महिलेच्या पती व मुलासही लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याची तक्रार बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.या घटनेचा अधिक तपास हवालदार रामचंद्र फरांदे करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!