
स्थैर्य, सातारा, दि.०२: कोरोना महामारीत जिल्हाधिकार्यांचे आदेश असतानाही एमआयडीसीमध्ये असणारी टेक प्रेसिजन इंजिनिअरिंग आस्थापना सुरु ठेवल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुरज सर्जेराव गायकवाड (वय 26, रा. देगाव रोड, अमरलक्ष्मी स्टॉप, कोडोली, सातारा), करण संजय शर्मा (वय 22, रा. निकम कॉलनी, चंदननगर, सातारा), ओम सुरेश ठाकूर (वय 20, रा. शिवराज पेट्रोल पंप, सातारा) अशी गुन्ह दाखल झालेल्यांची नावे आहेत. या तिघांनी दि. 31 रोजी कंपनी सुरु ठेवून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यामुळे सातारा शहर पोलीस ठाण्यगतील पोलीस शिपाई संतोष शेलार यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत.