वर्‍हाडी वाढल्याने लग्न मालकावर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.०७: करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लग्न समारंभासाठी प्रशासनाने केवळ 50 जणांना परवानगी दिली असताना सत्तरहून अधिक वर्‍हाडी मंडळी आल्याने ठोसेघर येथील लग्न मालकावर सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अप्पाजी भगवंत चव्हाण (रा. ठोसेघर, ता. सातारा), यशवंत खाशाबा जाधव (रा.घोटेवाडी,ता.पाटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक हेमंत ननावरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने लग्नात केवळ पन्नास लोकांना उपस्थितीचा नियम लागू केला आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी न करता सर्रास नियमांची पायमल्ली होत असल्याने कडक कारवाईच्या सुचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दि.3 रोजी ठोसेघर (ता. सातारा) येथे संशयितांनी त्यांच्या मुलांचा लग्न समारंभ आयोजित केला होता. त्या सोहळ्याला केवळ पन्नास लोकांची परवानगी असताना देखील सत्तहून अधिक लोकांची गर्दी जमल्याची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हांकारे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस नाईक हेमंत ननावरे यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार ननावरे यांनी ठोसेघर येथे जावून गर्दीबाबत मिळालेल्या माहितीची खात्री करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.


Back to top button
Don`t copy text!