जबरी चोरीप्रकरणी एकावर गुन्हा


स्थैर्य, सातारा, दि. २३: महिला पोलिस कर्मचर्‍याच्या हातातून मोबाईल व कॅलक्युलेटर हिसकावून जबरी चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी यल्या अनिल काळे रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, पो. ना. सरोजिनी शिंदे या शाहूपुरी जुनी ग्रामपंचायतीसमोरून चालत जात होत्या. यावेळी यल्या काळे याने शिंदे यांच्या हातातील मोबाईल आणि कॅल्क्युलेटर हिसकावून पळाला. तो आकाशवाणी झोपडपट्टीच्या दिशेने पळूत जात असल्याचे पो. ना. तडवी आणि पो. ना. माने यांना दिसले. तडवी यांनी ओळखून त्याच्या नावाने हाक मारताच त्याने मोबाईल व कॅलक्युलेटर तेथेच टाकून पसार झाला. याप्रकरणी यल्या काळे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार कुमठेकर करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!