सदर बझार येथे फ्लॅटमधून 12 हजारांचा ऐवज चोरीस


स्थैर्य, सातारा, दि. २३: येथील सदर बझारमध्ये एका फ्लॅटचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचा फायदा घेवून दोन मोबाईल व रोख रक्कम असाा 12 हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.

याबाबत रमेश दिगंबर सुकळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सदर बझारमध्ये जय जवान हौसिंग सोसायटीत त्यांचा फ्लॅट आहे. दि. 21 रोजी सायंकाळी 4 ते 6 च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फ्लॅटचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचा फायदा घेत विवोचा मोबाईल आणि सॅमसंगचा मोबाईल आणि रोख 5 हजार असा एकूण 12 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी हवालदार वाघ तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!