दैनिक स्थैर्य । दि.३१ जानेवारी २०२२ । सातारा । मुलीच्या लग्नाकरता ४0 हजार रुपयांची गरज असल्याने फिर्यादीने चार महिन्याच्या मुदतीकरता मालगाव येथील एकाकडून १0 टक्के दराने पैसे घेतले. त्याचे ५५ हजार रुपये दिले. दरम्यान, फिर्यादीकडून आधारकार्ड झेरॉक्स, स्टेट बँकेचे दोन कोरे चेक घेतले ते पैसे पूर्ण देवूनही अद्यापर्यंत परत दिले नाहीत, याप्रकरणी फिर्यादीने बेकायदेशीररित्या सावकारी करीत असणाऱ्या गणेश मारुती कदम रा. मालगाव ता. सातारा याच्याविरु ध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास सपोनि चौधरी हे करत आहेत.