पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.११:  सातारा तालुक्यातील अतित गावच्या हद्दीत असणार्‍या कराड ते सातारा रस्त्यावर एका हॉटेलजवळ दुचाकी स्लीप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिच्या पतीवरच बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेश विठ्ठल गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याल अटक करण्यात आलेली नव्हती. बोरगाव पोलिसांनीच हा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील माजगाव येथील राजेश विठ्ठल गायकवाड (वय 35, रा. माजगाव, ता. जि. सातारा) हे आपली पत्नी अश्‍विनी हिच्यासमवेत दुचाकीवरुन (एमएच 11 – एसी 9011) निघाले होते. ते भरधाव वेगाने दुचाकी चालवत होते. माजगाव गावच्या हद्दीत असणार्‍या हॉटेल निसर्गजवळ आल्यानंतर भरधाव वेगाने त्यांची दुचाकी स्लीप झाली. यात पाठीमागे बसलेल्या अश्‍विनी राजेश गायकवाड (वय 28) या खाली पडल्या. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. 18 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती. दरम्यान, पोलिसांनी केलेला पंचनामा आणि घटनास्थळावरील माहिती लक्षात घेता अश्‍विनी यांच्या मृत्यूस पती राजेश गायकवाड कारणीभूत असल्याचे समोर आले. यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर काशिनाथ सुर्वे (वय 42) यांनी राजेश याच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात हलगर्जीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरले असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार महाडिक करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!