स्थैर्य, सातारा, दि.१६: कर्मवीरनगर, एमआयडीसीमध्ये विवाहितेचा गेली अनेक वर्षे जाचहाट सुरू होता. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात तिने तक्रार दिल्यानंत तिचा पती व सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सुशीला गणपत भालशंकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पती गणपत आबाजी भालशंकर आणि सून उषा राजेंद्र भालशंकर यांनी वेळोवेळी किरकोळ कारणांवरून फिर्यादीचा पाणउतारा केला आहे. फिर्यादीला घरातील धुणेभांडी स्वयंपाक अशी कामे करायला लावून नोकरासारखी वागणूक दिली. दोन वेळचे पुरेसे अन्नही खायला न देता शिळे अन्न खाण्यास दिले. राहण्यासाठी अडगळीच्या खोलीत ठेवले. आजारपणांत औषधोपचाराचा खर्च केला नाही. तसेच ‘मी सांगेन तसेच राहायचे, हे घर निमुटपणे माझ्या नावावर करायचे, अन्यथा, मरणयातना देईन’ अशी धमकी सुन उषा भालशंकर हिने देत वेळप्रसंगी हाताने मारहाणदेखील केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेचा पती आणि सून यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार भोसले करत आहेत.