
दैनिक स्थैर्य | दि. १९ डिसेंबर २०२२ | फलटण | फलटण शहरातील काही सोशल मीडिया ग्रुप वर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काही अज्ञात इसमानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती बसल्या कट्ट्यापाशी ग्रीलवर कोयता मारला आहे अशी आशयाची पोस्ट प्रसारित झालेली आहे. सदर घडलेला प्रकार हा काल दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी रात्रीचे वेळी घडला होता, अशी माहिती फलटण उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे यांनी दिली.
सदरची घटना करणारे 3 पैकी 2 इसमाना ताब्यामध्ये घेण्यात आले आहे. एक अल्पवयीनचा शोध सुरू आहे. ताब्यातील इसमांकडे याबाबत चौकशी सुरू आहे. सदरचे इसमांवर भा.द.वि 394, 341,34 अन्वये गु.र.न. 580/22, 581/22, 582/22 असे जबरी चोरीचे 3 गुन्हे काल दाखल करण्यात आले असून त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे. सदरचा प्रकार या आरोपींनी दारूच्या नशेत केला असून घडल्या प्रकाराबाबत कोणती उलटसुलट चर्चा अथवा अफवां न पसरविता सार्वजनिक शांततेच्या दृष्टीने आरोपीवर पोलीस कठोर कारवाई करत असून त्यांना उचित शासन करण्यात येईल. सामाजिक सलोखा राखण्याचा दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती सुद्धा यावेळी पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी केली.