दैनिक स्थैर्य | दि. 18 ऑक्टोबर 2024 | फलटण | फलटणचे उपनगर असणाऱ्या चौधरवाडी येथे गोहत्या करून गोमास कॅनॉलमध्ये टाकण्याचा किळसवाणा प्रकार घडला असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांनी केला आहे. तरी हा किळसवाणा प्रकार कुणी केला असल्याचा याबाबतचा छडा लावण्याचे आवाहन सुद्धा शहा यांनी केले आहे.
याबाबत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अनुप शहा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
फलटण हे महानुभव व जैन समाजाची दक्षिणकाशी म्हणून प्रसिद्ध आहे. संतांची भूमी म्हणून सुद्धा फलटणचा उल्लेख होतो. परमपूज्य श्री गोविंद महाराज उपळेकर, सद्गुरु श्री हरिबाबा महाराज यांच्या समाधी ही फलटणमध्ये आहेत. आपल्या धर्माच्या परंपरेनुसार त्याचं पालन करत असतात व नगरपालिका नीरा उजवा कॅनल मधून येणाऱ्या पाण्यातून शहराला पाणीपुरवठा करत असते मात्र हा कॅनॉल तरडगाव, साखरवाडी, चौधरवाडी या मार्गे फलटण शहरातून पुढे पंढरपूर माळशिरस कडे जातो. कॅनॉलमध्ये काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक जातीय सलोखा बिघडवण्यासाठी गोहत्या करून या गोमातेचे मांस या कॅनल मध्ये टाकले असल्याचे सुद्धा अनुप शहा यांनी स्पष्ट केले आहे.