
स्थैर्य, फलटण, दि. २१ : फलटण शहर व तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या खूप मोठ्या वेगाने वाढत चाललेली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना डॉक्टरांच्या कडून एच.आर. सिटी करणे संदर्भामध्ये सल्ला दिला जात आहे. या एच.आर. सिटी मधून रुग्णाच्या फुफ्फुसाला किती प्रमाणामध्ये इन्फेक्शन झाले आहे हे समजत आहे. सध्या महाराजा मालोजीराजे सिल्वर जुबली रुग्णालयामध्ये १ सिटीस्कॅन मशिन उपलब्ध असल्यामुळे सिटीस्कॅन करण्यासाठी खूप मोठी रांग लागत आहे. रुग्णाला सिटी स्कॅन करणेसाठी नंबर यावयास कमीत कमी ७ तास वेळ लागत असल्यामुळे रुग्णांना खूप हाल सोसावे लागत आहेत. या सर्व गोष्टी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ताबडतोब याठिकाणी नवीन दोन सिटीस्कॅन मशिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेला आहे.
तालुक्यातील जनतेच्या सुख दुःखा मध्ये नेहमीच राजघराणे सहभागी होऊन लोकांना दिलासा देत असते. सध्या तर कोरोना या संसर्गजन्य आजाराची लागण खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना झाली आहे. अशा या कोरोना कालावधीमध्ये विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व स्वतः सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे दररोज सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यावर मार्ग काढून फलटण तालुक्यातील व शहरातील जनतेला दिलासा देण्याचे काम करीत आहेत.