स्थैर्य, तिरुवअनंतपूरम, दि.१३: केरळचे
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज कोरोना लशीसंदर्भात एक मोठी घोषणा केली.
केरळमध्ये कोरोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं
आहे.
केरळ आता तिसरे राज्य ठरले आहे, जिथे
कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या अगोदर
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी ऑक्टोबर महिन्यात
घोषणा केली होती की, एकदा कोरोनावरील लस आली की ती राज्यातील नागरिकांना
मोफत दिली जाईल. यानंतर मध्य प्रदेशकडून देखील ऑक्टोबरच्या शेवटी
अशाचप्रकारची घोषणा केली गेली.