स्थैर्य, फलटण, दि १४: कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाचा धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून फलटण तालुक्यातील सर्व व्यावसायिकांना व त्यांच्याकडील कर्मचार्यांना कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचे, फलटण उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.
सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोना या आजाराचे रुग्ण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सापडू लागलेले आहेत. तरी या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून फलटण संपूर्ण फलटण तालुक्यामधील कार्यरत असणारे दुकानदार, व्यापारी व त्यांच्याकडे कामाला असणार्या कामगारांची कोरोना चाचणी करून घेणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जो कोणी दुकानदार या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करून दुकान सील करण्यात येईल, असा इशाराही डॉ.शिवाजीराव जगताप यांनी दिला आहे.