स्थैर्य, फलटण 2 : आज बुधवार दि. 2 जून रोजी फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात सर्व सहा प्राथमिक आरोग्य केंद्राची ठिकाणे आणि त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्य कक्षेतील 13 ठिकाणी रॅपीड आणि आरटीपीसीआर कोरोना चाचण्यांसाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र बरड आणि त्यांच्या कार्य कक्षेतील राजुरी व साठे या गावात, प्राथमिक आरोग्य केंद्र बिबी आणि त्यांच्या कार्य कक्षेतील वाखरी, ताथवडा, उपळवे या गावात, प्राथमिक आरोग्य केंद्र गिरवी आणि त्यांच्या कार्य कक्षेतील वाठार निंबाळकर व बोडकेवाडी या गावात, प्राथमिक आरोग्य केंद्र राजाळे आणि त्यांच्या कार्य कक्षेतील सोमंथळी व विडणी या गावात, प्राथमिक आरोग्य केंद्र साखरवाडी आणि त्यांच्या कार्य कक्षेतील मुरुम व जिंती या गावात, प्राथमिक आरोग्य केंद्र तरडगाव आणि त्यांच्या कार्य कक्षेतील कुसुर व काळज या गावात कोरोना तपासणी विशेष शिबीर संपन्न होणार आहे.