स्थैर्य, फलटण, दि. ११ : 45 वर्षावरील ते 59 वर्षे वयोगटातील कोमोर्बीड (ह्दयरोग, मधुमेह, दुर्धर आजार) असणाऱ्या व्यक्तींना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीकरण देण्यात येत आहे. या लसीसाठी नागरिकांनी https://selfregistration.cowin.gov.in या लिंकचा वापर करुन आपल्या नावाची नोंदणी करावी. ज्या व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही त्यांनी आपले आधार कार्ड घेऊन लसीकरण सत्राच्या ठिकाणी भेट देऊन नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन फलटण नगर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. सुवर्णा खानविलकर यांनी केले.
नगरसेविका सौ. सुवर्णा खानविलकर यांनी नुकतीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली. नागरिकांची रुग्णालयात गर्दी होत आहे. नागरिकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे. फलटण शहरात असणाऱ्या लोक सेवा केंद्रा (सीएससी केंद्र) मध्येही रजिस्ट्रेशन करता येईल. ४५ वर्षावरील व्याधी असणाऱ्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी तसेच ऑनलाईन राजीस्ट्रेशन करताना काही अडचणी आल्या तर संपर्क साधावा असेही आवाहन नगरसेविका सौ. खानविलकर यांनी नागरिकांना केलेले आहे.