स्थैर्य, कोळकी, दि. २८ : कोरोनाच्या जागतिक महामारीचे सावट मालोजीनगर (कोळकी) येथील हनुमान मंदिरातील हनुमान जन्मोत्सव सोहळ्यावर दिसून आले. दरवर्षी मोठ्या उत्साहात हा जन्मोत्सव साजरा होत होता. मात्र, गतवर्षापासून कोरोनाने कहर केल्याने हा जन्मोत्सव सोहळा रद्द करण्यात आला. दरम्यान, लोकडाऊनचे सर्व नियम पाळून यावर्षी हनुमान मंदिराततील मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्याचबरोबर या मंदिराच्या गाभाऱ्याची व समोरील सभामंडपाची स्वच्छता करण्यात आली. कोळकी युथ फौंडेशनच्यावतीने येथील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे नियोजन दरवर्षी केले जाते. कोरोनामुळे हे कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले.