म्हसवड शहरात सुरु असलेल्या जनता कर्फ्यु मुळे बंद असलेली बाजारपेठ
म्हसवड शहरातील भगवानगल्ली बनली कोरोना हॉटस्पॉट
स्थैर्य, म्हसवड दि.२४ : माण तालुक्यात कोरोना संसर्ग वाढण्याचे सर्वाधिक प्रमाण हे म्हसवड शहराचे असुन या एकट्या शहराने कोरोना रुग्णाचे शतक पार केले आहे तर याच शहरातील भगवानगल्लीत हे सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याने ही गल्ली सध्या कोरोना हॉटस्पॉट बनली असुन या गल्लीतच दररोज कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाने ही संपुर्णपणे सिल केली आहे.
म्हसवड शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने याठिकाणी संपुर्ण शहरच कंन्टेटमेंट झोन बनले असुन दररोज वाढणारे कोरोनाचे रुग्ण प्रशासनाची धावपळ वाढवत आहेत.गत महिन्यापुर्वी माण तालुक्याची कोरोना वाटचाल ही शतकाकडे सुरु होती मात्र आज एकट्या म्हसवड शहरात शंभर हुन अधिक कोरोनाचे रुग्ण झाल्याने संपुर्ण शहरच हादरुन गेले आहे. सुरुवातीला दररोज ५ ते १० अशी वाढणारी रुग्ण संख्या आता दुप्पट झाली असुन दि. २३ रोजी रात्री उशीरा आलेल्या कोरोना अहवालानुसार म्हसवड शहरात १८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर यापैकी १२ रुग्ण हे एकट्या भगवान गल्लीतील असल्याने सध्या ही गल्ली कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहे.
दि. २३ रोजी रात्री उशीरा आलेल्या कोरोना अहवालानुसार भगवान गल्ली येथील ३० वर्षीय महिला, १० वर्षीय मुलगी, ३२ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, २७ वर्षीय महिला, ८ वर्षीय मुलगी, ६ वर्षीय मुलगी, ५ वर्षीय मुलगा, १२ वर्षीय मुलगा, ४४ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, ७५ वर्षीय पुरुष, तर येथील आंबेडकरनगर येथील २७ वर्षीय महिला, १८ वर्षीय मुलगा, २१ वर्षीय महिला, २४ वर्षीय महिला व २ वर्षीय बालिकेचा समावेश असुन या सर्वांचा कोरोना अहवाल हा पॉझीटिव्ह आला असल्याचे आरोग्य विभागा कडुन सांगण्यात आले.
शहरातील भगवानगल्ली व आंबेडकरनगर ही दोन्ही ठिकाणी सध्या कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असुन कोणीही घराबाहेर पडु नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका व आरोग्य प्रशासनाने म्हसवडकर नागरीकांच्या सुचनेनुसार शहरात ५ दिवसांचा जनता कर्फ्यु पुकारला असल्याने शहरात सध्या फक्त मेडीकल्स् व दवाखाने वगळता सर्व काही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
लक्षणे नसल्याले रुग्ण होम आयसुलेशन मध्ये –
सध्या कोरोनाचे रुग्ण म्हसवड सह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढु लागले असल्याने शासकीय रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे समोर येवु लागले असल्याने प्रशासनाने ज्या रुग्णांचा कोरोना अहवाल हा बाधित आहे पण त्यांना तीव्र अशी कोणतीच लक्षणे नाहीत अशांना सध्या होम आयसुलेशन मध्ये ठेवण्याच्या सुचना केल्या असुन अशा रुग्णांना दररोज आरोग्य कर्मचारी व डॉक्टर त्यांची घरी जावुन तपासणी करणार आहेत.
शहरातील ३ खाजगी रुग्णालये केली जाणार अधिग्रहण –
म्हसवड शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असल्याने या रुग्णांना दाखल करुन घेण्यास आरोग्य विभागाला अडचणी येवु नयेत याकरीता तालुका वैद्यकिय अधिकार्यांनी शहरातील सर्व सुविधा असलेली ३ खाजगी रुग्णालये अधिग्रहण करण्यात संदर्भात प्रांताधिकार्यांना सुचवले असुन लवकरच शहरातील ती रुग्णालये प्रशासनामार्फत अधिग्रहण केली जाणार असल्याचे समजते.