वाघोलीतील बाधित व्यक्तीच्या वृद्ध मातेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक,दि. 24 : वाघोली ता. कोरेगाव येथे शुक्रवार दिनांक रोजी कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर आज दिनांक २४ रोजी संबंधित व्यक्तीच्या  वृद्ध मातेची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची बातमी मिळताच उत्तर कोरेगाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.तसेच तालुका प्रशासन खडबडून जागे झाले.

वाघोली ता कोरेगाव या ठिकाणी  दिनांक २० रोजी  कोरोना बाधित व्यक्ती आपल्या कुटुंबियांसह दाखल झाला होता.ग्राम कृती समिती व आरोग्य विभाग यांनी सर्तकता राखत त्यांना कौटुंबिक विलिगिकरणात ठेवले होते.तत्पूर्वी बाधित व्यक्तीचा स्वॉब नमुना मुंबई येथे घेण्यात आला होता.परंतु संबंधित व्यक्तीने ही माहिती लपवून ठेवली होती. दरम्यान त्या रूग्नाचा अहवाल दिनांक २२ रोजी सकारात्मक आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित व्यक्तीचा सकारात्मक अहवाल मिळताच आरोग्य विभागाने तत्काळ संबंधित व्यक्तीला सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रूग्णालयात तर त्यांच्या ४ निकटवर्तीयांना बह्मपुरी येथे संस्थांत्मक विलिगिकरणात हलविले होते त्यानंतर आज सकाळी संबंधित कोरोना बाधित व्यक्तीच्या वृद्ध मातेचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने संपूर्ण प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

दरम्यान संबंधित व्यक्तीच्या आणखी निकटवर्तीय सहवासितांचे चाचणी अहवाल प्रलंबित असून  प्रतिबंधित उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने संबंधित कुटुंबियांना इतरञ हलविण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाकडून ज्या ठिकाणी विलगिकरण  करून ठेवण्यात आले होते तो प्रस्तावित परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

दरम्यान वाघोली पासून तीन किमी अंतरावर असलेल्या पिंपोडे बुद्रुक येथील एका व्यक्तीचा काल दिनांक २३ रोजी कोरोना अहवाल  सकारात्मक आल्यानंतर प्रशासनाने बाधित रूग्न वास्तव्यास असणाऱ्या विलगीकरण ठिकाण केंद्रस्थानी धरून मौजे पिंपोडे बुद्रुक मधील प्रस्तावित केलेले क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!