स्थैर्य, इचलकरंजी, दि. 23 : सोलापूर येथून एका कार्यक्रमाला जाऊन आलेल्या दोन विवाहित बहिणी व त्यांच्यातील एकीची 8 वर्षीय मुलगी यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने इचलकरंजी हादरली आहे.
17 मे पासून यड्राव येथील अलफोनसा स्कुल मध्ये एक महिला तिची 8 वर्षीय मुलगी व त्या महिलेच्या बहिणीला संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले होते. पण त्यातील एका महिलेचे लहान बाळ असल्याने तिला होम कोरोन्टाईन करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी आलेल्या रिपोर्ट मध्ये या दोन महिला व 8 वर्षीय मुलगीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे इचलकरंजी शहराला मोठा झटका बसला आहे.
कृष्णानगर भाग रात्रीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून प्रशासनाने येथे बंदोबस्त ठेवला आहे.
यापूर्वी शहरात एकूण तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आले असून त्यातील दोन रुग्ण उपचार होऊन बाहेर आले आहेत तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे .गेले अनेक दिवस हे शहर चिंतामुक्त होते मात्र रात्री आलेल्या रिपोर्ट मुळे शहराला आता चिंता लागली आहे. आज दिवसभर तपासून आलेले 120 अहवाल निगेटिव्ह होते. मात्र रात्री आलेल्या रिपोर्ट मध्ये इचलकरंजीच्या तीन रुग्णांचा समावेश झाला आहे.ते तीन रुग्ण एकाच घरातील आहेत.