
![]() |
डॉ. संतोष मोरे यांचा सत्कार करताना अंकुशराव दबडे व खटाव तालुका सोशल फौंडेशनचे पदाधिकारी.(छाया-समीर तांबोळी) |
स्थैर्य, कातरखटाव, दि. ०४ : कोरोना संसर्गजन्य आजारावर यशस्वी मात केलेल्या काही मान्यवरांचा सहकारी व नागरीकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामधे पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे, एनकुळ येथील शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष मा. ए. खाडे, तडवळे येथील आदर्श शिक्षक नवनाथ साबळे व त्यांच्या पत्नी आरोग्य सेविका सौ. साबळे यांचा समावेश आहे.
डॉ. मोरे यांच्या सत्कारप्रसंगी खटाव तालुका सोशल फौंडेशनचे अध्यक्ष अंकुशराव दबडे, संस्थापक धनंजय क्षीरसागर, शिक्षक समितीचे तालुका सरचिटणीस नवनाथ जाधव, आयाज मुल्ला, मोंगिया मोरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. मोरे यांनी कोरोना कालावधीतील अनुभव सांगितले. तसेच लोकांनी आजाराचा बाऊ करण्यापेक्षा सकस आहार, औषधोपचार घेवून आजाराला सामोरे जावे. ज्याची मनस्थिती खंबीर आहे त्याला कोरोना आजार काहीही करु शकणार नाही.