
स्थैर्य, दि.१०: कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा शोध जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) एक पथक घेत आहे. तज्ञांच्या या पथकाने मंगळवारी सांगितले की, हा विषाणू प्रयोगशाळेतून पसरल्याची शक्यता नाही. विषाणू प्राण्यांमधून मानवात आल्याची शक्यता जास्त आहे. तपास पथक सध्या वुहानमध्ये आहे, जेथून महामारी पसरली. पथकाने १२ दिवसांच्या चौकशीनंतर ही माहिती दिली. पथकाने वुहानचा प्राणी बाजार, प्रयोगशाळा आणि त्या सर्व ठिकाणांवरून माहिती गोळा केली आहे जेथून कोरोना पसरण्याची शक्यता आहे.
तज्ञांच्या पथकाचे नेतृत्व करणारे अन्न सुरक्षा शास्त्रज्ञ डॉ. पीटर के बीन इम्बरेक यांनी वुहानमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, आम्ही विषाणूंवर काम पूर्ण केले आहे. एका नैसर्गिक पाणीसाठ्यातून विषाणूचा फैलाव झाल्याची शक्यता आमच्या चौकशीत दिसते. या आधी अनेक माध्यमांच्या वृत्तांत म्हटले होते की, कोरोना विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून पसरला.