स्थैर्य, फलटण, दि.१: कोरोना जन्म 16 मार्च 2020 तेव्हापासून दिनांक 24 मार्च 2021 पर्यंत माझ्यासहित अवघ्या महाराष्ट्रातील सर्व मनुष्यप्राणी सर्वजण (ज्यांना कोरोना झाला नाही असे) एकमेकांना फोनवरूनच कसा आहेस? ठिक आहेस का? काय करतो कोरोना आलाय बाहेर फिरू नको, करता असेल तर मुलाबाळांवर लक्ष दे असं म्हणत मनात काळजी घे ! टेन्शन घेऊ नका !! असे उद्गार सर्रास एकमेकांच्याकडून येत होते. बघता बघता सात-आठ महिने धुमाकूळ लॉकडाऊन मध्ये निघून गेले. त्याकाळात प्रचंड रुग्ण झाले. 35 ते 50 तर काही 60 ते 95 पर्यंतच्या व्यक्ती या विळख्यात सापडल्या. त्यातूनच ज्यांना शुगर, बीपी, ऑपरेशन्स असणार्या व्यक्ती तर भीतीपोटी ऑक्सीजनवर तर काही आयसीयूमध्ये दाखल कराव्या लागल्या.
घरातील व्यक्तींची काळजी, टेन्शनमध्ये कसं व्हायचं, व्यवसाय, शेतीचे नुकसान, दळणवळण, आर्थिक व्यवहार ठप्प. त्यामुळे बँका, सोसायट्या, गृहकर्ज या सर्वांच ओझ वेगळच होतं व त्यामुळे बरेचसे मृत्यूच्या दाढेत सापडले. ते इह लोक सोडून परलोकी गेले.
कोरोनाचा गंभीर प्रसंग माझ्या व माझ्या सुविद्य पत्नीवर आला त्यावेळी प्रत्यक्षात आलेल्या अनुभवामुळेच हा आतला पत्रकार जागा झाला व हे लिहिण्याचा अट्टाहास घातला. तो अनुभव प्रथम गाव, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, सातारा कोवीड हॉस्पिटल Aए-1स्टार रुग्णसेवासाठीचे. उभयतांचा प्रवास सातारा येथे आल्यावर असे वाटले की आम्ही एखाद्या थ्री स्टार हॉल रुग्णालयातच आलो आहे. कारण येथील स्वच्छता, टापटीपपणा, खाट रचना, स्वच्छ नामांकित कंपनीचे उपकरणे, साहित्य ठेवण्याची पद्धती त्यावर कार्यरत असलेला प्रशिक्षित स्टाफ, आपुलकीने त्यांनी केलेली स्वागत. या आजी, आजोबा, काका,काकी,मावशी,दादा अशी मायेची हाक. प्राथमिक तपासण्या, सर्व प्रकारचे एक्स-रे, स्कॅनिंग करीत रूममध्ये प्रवेश करेपर्यंत पिशवी घेऊन कॉटवर बसवतात. त्यानंतर प्रत्यक्षात आरोग्य देवताच सेवेसाठी आल्याप्रमाणे उपचाराला सुरुवात होत असताना आपणास आलेला 80 टक्के दडपण चाळीस टक्के वर येते. त्यातच सर्व प्राथमिक उपचार सेवेमध्ये मग्न असलेले डॉक्टर्स, त्यांचे सहकारी, स्टाफ मग तो सिस्टर्सपासून वॉर्डबॉय, मावशी, मामा, अन्न देणारे, सफाईवाला सर्वजण कसे एका विचाराने, एक दिलाने, मनाने कार्यसेवेत तत्पर असल्याचे प्रकर्षाने जाणवले. यांच्यावर करडी नजर असलेले हॉस्पिटल इन्चार्ज डॉ.सुरेंद्र डबडेहे तर फारच आपुलकीने काही कमी जास्त व्यवस्थित मिळते का ते पाहतात व सर्वच रुग्णांची खरी काळजी व रुग्ण बरा होण्याचं टेन्शन घेतात.
आम्हा सर्वांचे मायबाप सरकार महाराष्ट्र शासन अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच जिल्हाधिकारी शेखर सिंह, सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय प्रमुख, प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व अधिकारी व सर्व संबंधित मंत्री कोव्हिड योद्धे यांच्यामुळे सातारा जिल्ह्यात ही सुविधा उपलब्ध झाली आहे. कोवीड रुग्णांना दडपण मुक्त श्वास । जगण्याचा जीवनाचा विश्वास ॥ मिळण्यात याची मदतच होत आहे.
– शब्दांकन
संजय किकले,
तरडगाव, ता. फलटण.
7028546242