बारामतीतील गोविंदबागेत कोरोनाचा शिरकाव : चार कर्मचार्‍यांना


  

स्थैर्य, बारामती, दि. 21 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी काम करणार्‍या चार कर्मचार्‍यांना  कोरोनाची लागण झाली आहे. बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज ही संख्या 473 झाली आहे. शरद पवार यांच्या घरी काम करणार्‍या चार कर्मचार्‍यांना कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे शेतात, बागेत काम करणारे कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

गोविंदबागेतील जवळपास 50 कर्मचार्‍यांचे दोन टप्प्यात स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी आज 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी 12 कर्मचार्‍यांना कोरोना झाला होता.

दरम्यान, पवार नियमितपणे बारामती निवासस्थानी येत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा बारामतीत दौरा होता. मात्र तो अचानक रद्द झाला होता. सध्या प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?, करता येतील  त्याचा आढावा घेतला आहे.

 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!