स्थैर्य, दि.२५: मागील 5 ऑगस्टपासून कोरोनाशी झुंज देत असलेले प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. बालासुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होते. मात्र, गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती नाजूक झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.
एसपी यांना प्रेमाने ‘बालू’ म्हटले जाते. ज्यांच्या आवाजात अशी जादू आहे की, प्रत्येकजण त्यांच्या प्रेमात पडतो. मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्यासारख्या दिग्गजांमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या या गायकाचा आवाज इतरांपेक्षा अगदी वेगळा आहेे. बाला हे बॉलिवूडमध्ये सलमान खानचा आवाज म्हणून ओळखले जातात. सुमारे दशकभर त्यांनी सलमानसाठी एकाहून एक गाणी गायली. मैनें प्यार किया या चित्रपटातील दिल दिवाना या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरचा अवॉर्ड मिळाला होता.
बालासुब्रमण्यम यांना
- 2001 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला.
- 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
- 2016 मध्ये सिल्व्हर पीकॉक पदक देऊन इंडियन फिल्म पर्सानालिटी ऑफ द इयरचा सन्मान मिळाला.
- 25 वेळा आंध्र प्रदेशद्वारे तेलुगू चित्रपटात योगदानासाठी नंदी अवॉर्ड मिळाला.
- 40 हजारांपेक्षा जास्त गाणी रेकार्ड केलीत.
- 06 वेळा बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरचा नॅशनल अवॉर्ड मिळाला.