ग्रामीण भागातील कोरोना केअर सेंटर कोरोनाबधितांसाठी वरदायनीच : श्रीमंत रामराजे; साठे येथील कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २०: सध्या सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत आहे. कोरोनाला आपल्या गावापासून दूर रोखण्यासाठी ग्रामीण भागातीलच कोरोना केअर सेंटर ही कोरोनाबाधितांसाठी वरदायिनी ठरणार आहेत, असे मत विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

साठे ता. फलटण येथील लक्ष्मी नारायण लॉन्स मंगल कार्यालय येथे लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्या वेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर, सौ. रेखा खरात, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार, बापूराव गावडे, सौ. राजश्री माने, विक्रमसिंह जाधव, मनोज गावडे, बजरंग खटके, संजय कापसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सध्या फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. ग्रामीण भागामध्ये सोय नसल्याने गृह विलीगीकरणाचे नियम हे काटेकोरपणे पाळले जात नाहीत. त्या मुळे फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना केअर सेंटर सुरू होणे हे अत्यंत गरजेचे आहे. जर कोणत्याही नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला तर त्यांना तातडीने कोरोना केअर सेंटर मध्ये हलवणे गरजेचे आहे. फलटण तालुक्यातील कोणत्याही नागरिकांना जर कोरोना बाबत गैरसोय होत असेल तर त्यांनी तातडीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुरस्कृत राजे गटाकडे संपर्क साधावा, असे आवाहन सुद्धा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी केले.

कोरोना या आजाराला आपल्या तालुक्यातुन हद्दपार करण्यासाठी मी स्वतः राज्य शासनाच्या माध्यमातून कार्यरत आहे. फलटण तालुक्यातील नागरिकांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असे ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत सापडत आहेत. ग्रामीण भागांमधून कोरोनाची साखळी मोडण्यासाठी कोरोना केअर सेंटरच उपयुक्त ठरणार आहे, असे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

लक्ष्मीनारायण लॉन्सचे मालक दत्तात्रेय शेंडे यांनी कोरोना केअर सेंटर साठी मोफत हॉल देऊन सहकार्य केल्याने त्यांच्या या अनोख्या समाजसेवेचे फलटण तालुक्यातुन कौतुक होत असून आगामी काळामध्ये फलटण तालुक्यातील नागरिकांसाठी त्यांनी एक अनोखा आदर्श घालून दिलेला आहे.


Back to top button
Don`t copy text!