
स्थैर्य, सातारा, दि. 6 : सातारा येथील विसावा नाका परिसरातून एका कंपनीतून 25 हजारांची तांब्याची तार चोरीस गेल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्रसन्न वसंत मोहिते यांनी सातारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रसन्न मोहिते यांच्या विसावा नाका परिसरातील कंपनीतून अज्ञाताने 50-50 मीटरचे 5 तुकडे असलेले 25 हजारांची तांब्याची केबल चार्जर दि. 2 ते 2.25 वाजण्याच्या सुमारास चोरट्याने लंपास केली. यापकरणी सातारा शहर पोलिस ठाण्याचे पो. ना. दगडे तपास करत आहेत.