जिंतीच्या जितोबा विद्यालयातील दहावीच्या १९९४ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ मार्च २०२३ | फलटण |
रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती, ता.फलटण येथील दहावीच्या १९९३/९४ च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा लोणावळा येथे नुकताच आनंदात पार पडला. यावेळी सर्व मित्र तब्बल २९ वर्षांनी पुन्हा भेटल्याने त्यांनी एकमेकांची आस्थेने चौकशी करीत ‘ही दोस्ती तुटायची नाय’ असा संदेश देत एकमेकांबरोबर गप्पा मारल्या.

मैत्री जीवनातील अनेक प्रसंगी होते, पण गरिबी डोक्यावर असताना जी शाळेत मैत्री झालेली असते ती कधीच त्या आठवणीतून/मनातून/हृदयातून जात नाही. श्री जितोबा विद्यालय जिंती येथील १९९३/९४ चे विद्यार्थी तब्बल २९ वर्षानी भेटले आणि आपल्या जुन्या नव्या आठवणीने त्यांना पुन्हा आपण लहानच असल्याचे वाटू लागले. त्यावेळच्या मित्रांबरोबरच्या आठवणी काढून त्यांचे डोळे अक्षरशः भरून आले.

दरम्यान, रयत शिक्षण संस्था ही स्व. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केली. त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले असून त्यामध्ये त्याकाळचे मुख्याध्यापक बी. के.चव्हाण व त्यांच्याबरोबर असलेले सर्वच शिक्षक यांनी केलेले मार्गदर्शन व संस्कार अजूनही टिकून असल्याचे या सर्वांना जाणवले. त्यामुळे भेटायला आल्यानंतर सर्वांनी मिळून आपल्या जीवनातील चढउतार व इंटरेस्टिंग स्टोरी सांगितल्या. त्या ऐकून अनेकांनी आपली ओळख सांगितली. तसेच आपन एक जबाबदार नागरिक आहोत व आपल्यावर ग्रामदैवत श्री जितोबा देवाचे आशिर्वाद असल्याने यापुढे सर्वांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ, असे अभिवचन दिले.

दरम्यान, हा स्नेहमेळावा लोणावळा-खंडाळा या निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या ‘दि ड्युकस रीट्रीट’ या आलिशान हॉटेलमध्ये पार पडला.

यावेळी अ‍ॅड. अनिल भोईटे, अ‍ॅड. सारिका खलाटे, अ‍ॅड. विजय भोसले, उद्योजक रवींद्र गिरी, अनिता रणवरे, मनीषा रणवरे, सुनीता शिंदे, रुपाली रणवरे, राणी रणवरे, सचिन बर्गे, नंदकुमार भोसले, विजय मोरे, दीपक कुदळे व पत्रकार यशवंत खलाटे पाटील उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!