स्थैर्य, फलटण : शेतकर्यांच्या दुधाला आधारभूत भाव, पशुखाद्य किंमतीवर नियंत्रण व शेतीसाठी लागणारी बि-बियाणे, रासायनिक खते व औषधे यामधील भेसळ व किंमतवर नियंत्रण असावे. या मागण्यांची तत्काळ दखल घेतली नाही तर संभाजी बिग्रेड रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशारा असलेले निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रभारी तहसिलदार आर. सी. पाटिल यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे, सातारा जिल्हा सरचिटणीस प्रदीप घाडगे, फलटण शहर अध्यक्ष संग्राम साळुंखे, बजीरंग भगत, वैभव सस्ते, तुषार सस्ते, संतोष जाधव, अजित शिंदे, मनोज जगताप, गोट्या शिंदे यांची उपस्थिती होती.