
![]() |
वेदिका माळवे हिच्या वाढदिवसनिमित्त आरोग्य साहित्य वाटपप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सपोनि भापकर, सी. एम. पाटील, मानसिंग माळवे व इतर.(छाया :समीर तांबोळी) |
स्थैर्य, कातर खटाव, दि. ०९ : जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे यांनी आपल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांना आरोग्य साहित्य वाटप करुन शासनाच्या ‘लेक लाडकी’ अभियानास हातभार लावला.
माळवे यांची नात वेदिका उर्फ ईश्वरी हिच्या वाढदिवसानिमित्त माळवे कुटुंबियांतर्फे दरवर्षी वेगवेगळे विधायक उपक्रम राबवले जातात. चालू वर्षी कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने वाढदिवस छोटेखानी करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने पुसेसावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस ठाण्यात सॅनिटायझर स्टँडचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीपअण्णा विधाते यांच्याहस्ते वाटप शुभारंभ झाला. यावेळी औंधचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, बाजार समितीचे माजी सभापती सी. एम. पाटील, सरपंच सुरेश कदम-पाटील, अनिल माने, धनंजय क्षीरसागर, महेश पाटील, बापुराव थोरवे, नेताजी सरनोबत, संग्राम माळी, राजेंद्र माळवे, अभिजित माळवे, डॉ. अमित घोटाळे, डॉ. स्नेहा डांगे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
किरण माळवे यांनी स्वागत केले.