स्थैर्य, सातारा, दि. ०९ : कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन मिळावी यासाठी 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांनी दिनांक 8 आणि 9 ऑगस्ट 2020 या दोन दिवशी ऑनलाईन आंदोलन केले. या आंदोलनामध्ये दिनांक 8 रोजी मा. मुख्यमंत्री आणि मा. पंतप्रधान यांना वैयक्तिक ई-मेल पाठवून आमची जुन्या पेन्शनची मागणी पूर्ण करावी व कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन सुरू करावी अशी मागणी ई-मेलच्या माध्यमातून करण्यात आली. दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधून ट्विटर वार करण्यात आले. यामध्ये NPSनिजिकरणभारतछोडो हा हॅशटॅग वापरून भारतभर मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री त्याचबरोबर सर्व मंत्री आणि वेगवेगळ्या माध्यमांना ट्वीट करण्यात आले. या आंदोलनाला देशभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामध्ये प्राध्यापकांच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समिती सहभागी झाली होती. या समितीच्या माध्यमातून हजारो प्राध्यापकांनी ई-मेल पाठवले त्याचबरोबर ट्विट केले. कोरोनाच्या काळामध्ये आपली मागणी न्याय्य मार्गाने सर्व कर्मचाऱ्यांनी मा. मुख्यमंत्री आणि मा. पंतप्रधान यांच्याकडे केली. या दोनही आंदोलनाला भारतभर व महाराष्ट्रभर उस्फुर्त प्रतिसाद लाभला.सातारा सांगली व कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समिती यांच्यावतीने दिवसभर मोठ्या प्रमाणात ई-मेल पाठवण्यात आले व ट्विट करण्यात आले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेचे पदाधिकारी डॉ भरत जाधव ,डॉ सोमनाथ वाघमारे ,डॉ मारुती तेगमपुरे यांनी व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.