दैनिक स्थैर्य | दि. ३१ जुलै २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास होत आहे. रस्ते विकासाचा प्रमुख मार्ग असून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारच्या वतीने वाडीवस्तीवर दर्जेदार रस्ते होत आहेत, असे प्रतिपादन अॅड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
माजी जि. प. सदस्य अॅड. सौ. जिजामाला रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्या हस्ते विंचुर्णीमार्गे मांडवखडक ते निरगुडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
अॅड. सौ. नाईक निंबाळकर म्हणाल्या की, केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्या माध्यमातून तालुक्याचा मोठा विकास होत आहे.
यावेळी भाजपा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सुशांतभैया निंबाळकर, स्वराज्य पतसंस्थेचे चेअरमन अभिजितभैया ना. निंबाळकर, निरगुडी विकास सोसायटीचे चेअरमन युवराज सस्ते, उद्योजक शरदनाना सस्ते, उद्योजक सागरशेठ शहा, शंभूराज बोबडे, माजी सरपंच सौ. अस्मिता निंबाळकर, विंचुर्णी सरपंच सौ. राणीताई चव्हाण, उपसरपंच सौ. पूनमताई इथापे, दिपक निंबाळकर, जयदीप निंबाळकर, कॉन्ट्रॅक्टर अमोल निंबाळकर, पंढरीतात्या इथापे, मानसिंग इथापे, नवनाथ बागल, हणमंत बागल, बुवासाहेब बागल, आदिनाथ ननावरे, आशिष ननावरे, संजय निकाळजे, संजय भोईटे, सुरेश गायकवाड, राजेंद्र चोरमले, मामा निकाळजे व इतर मान्यवर उपस्थित होते.