प्रबुद्ध विद्याभवन मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या प्रबुद्ध विद्याभवन मध्ये ७३ वा संविधान दिन अत्यंत आनंद, उत्साहात साजरा करण्यात आली. या प्रसंगी प्रबुद्ध विद्याभवन वर्ग दुरूस्तीसाठी मदत करणाऱ्या बांधवांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी विचार व्यक्त करताना कांबळे गुरूजी म्हणाले, “भारताचे संविधान हे जगामध्ये सर्वाधिक मोठे आणि आदर्श आहे. त्याप्रमाणे आपण जिवन अनुसरले पाहिजे. भीमजयंती मंडळ फलटणचे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे म्हणाले.” बाबासाहेबांनी जगातील सगळ्या देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून ३ वर्षाच्या आत संविधानाची निर्मिती केली.

जयंती मंडळाचे माजी अध्यक्ष व शाम अहिवळे म्हणाले, “आपल्या सर्व विद्यार्थ्यांची संविधान प्रस्ताविका पाठ आहे हे पाहून ऐकूण आनंद झाला. संविधान रॅली यावेळी प्रतिवर्षा प्रमाणे प्रबुद्धच्या विद्यार्थ्यांनी संविधान रॅली काढून भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेबांना आंबेडकर चौकात अभिवादन करण्यात आले.आंबेडकर चौकात संविधान प्रस्ताविकेचे वाचन जिल्हा पोलिस उपनिरीक्षकांनी केले.

कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक सचिन अहिवळे, आबासोा यादव, एस. डी. कांबळे, संघमित्रा अहिवळे, तात्या गायकवाड, निलेश गायकवाड, वैभव काकडे, मदन नागरगोजे, धनश्री नागरगोजे, प्रतिक गायकवाड, उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत संस्थाध्यक्ष प्रबुद्ध सिद्धार्थ यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक कारंडे यांनी केले. कार्यक्रमाची व्यवस्था महादेव गुंजवटे, वनिता कांबळे/मोरे, जयश्री होनराव यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!