इंग्लंडसोबतच्या टी20 सीरिजपूर्वी टीम इंडियाला दिलासा; ‘या’ स्टार खेळाडूचं कमबॅक


स्थैर्य,दि. ११ : शुक्रवारपासून सुरु होणारी इंग्लंड विरोधातील टी20 सीरिज सुरु होण्यापूर्वी टीम इंडियासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजा दोन महिन्यांनी मैदानावर परतला आहे. रवींद्र जाडेजा अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. अशातच आपल्या दुखापतीतून सावरल्यानंतर जाडेजाने पुन्हा एकदा संघासोबत प्रॅक्टिस सुरु केली आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर रवींद्र जाडेजा गोलंदाजी आणि फलंदाजी करताना दिसला.

रवींद्र जाडेजाने स्वतः पुन्हा संघासोबत प्रॅक्टिस सुरु केली असल्याची माहिती दिली. जाडेजाने मैदानावर वापसीचा व्हिडीओही शेअर केला आहे. जाडेजाने लिहिलं की, “दोन महिन्यांनी मैदावार उतरल्यानंतर चांगंल वाटत आहे.”


Back to top button
Don`t copy text!