मोदी सरकारच्या काळात १२ हजार कोटींचा लोहखनिज निर्यात घोटाळा, काँग्रेसचा आरोप


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.९: गेल्या सहा
वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील
सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप झाला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळाता
तब्बल १२ हजार कोटींचा लोहखनिज निर्यात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने
केला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, केंद्रात
बसलेल्या मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांत अशी अनेक उदाहरणे दिली आहेत
ज्यामुळे स्पष्ट होते की हे सरकार केवळ आपल्या काही मोजक्या मित्रांसाठी
सत्तेवर आले आहे.

पवन खेरा म्हणाले की, २०१४ पूर्वी लोहखनिजाची निर्यात केवळ एमएमटीसीच्या
माध्यमातूनच करण्यात येत असे. एमएमटीसीसुद्धा केवळ ज्यामध्ये ६४
टक्क्यांपर्यंत लोहखनिजाचा अंश असेल त्याच लोहखनिजाची निर्यात करत असे.
त्यावर लोहाचा अंश अशलेल्या खनिजाची निर्यात करण्यापूर्वी एमएमटीसीलासुद्धा
सरकारची परवानगी घ्यावी लागत असे. एमएमटीसीमध्ये ८९ टक्के भागीदारी ही
सरकारची आहे. लोकखनिज निर्यात करण्यापूर्वी ३० टक्के निर्यात शुल्क
आकारण्यात येत असे. उच्च प्रतिचे लोहखनिज हे देशात राहावे आणि देशातील
स्टिल प्लँटसाठी त्याचा वापर करता यावा हे त्यामागचं कारण होतं.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!