स्थैर्य, अमरावती, दि. 29 : इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. काँग्रेसचे आंदोलन बेगडी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पेट्रोल, डिझेलची कॉस्ट सी थ्रू आहे. राज्याने पेट्रोल, डिझेलवर टॅक्स लावल्यानेच पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत. त्यामुळे हे आंदोलन बेगडी आंदोलन आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे केली.
दरम्यान, कापूस खरेदी संदर्भात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. विहित मुदतीत राज्य सरकार कापूस खरेदी करू शकले नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली तर केंद्र सरकार कापूस खरेदी करायला तयार होते. त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला 5 हजार 700 कोटी रुपये दिले आहेत. बोगस बियाणे संदर्भात दोषीवर कारवाई झाली पाहिजे, पण आज शेतकर्यांची नुकसान भरपाई कोण करून देणार? त्यामुळे शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, बोगस बियाणे संदर्भात कायद्याप्रमाणे कारवाई करावी तर शेतकर्यांचे यात रितसर अर्ज घ्यावे, असेही फडणवीस यांनी सांगितले.