माणमध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन


स्थैर्य, बिदाल, दि. 6 : केंद्र शासनाने केलेल्या अन्यायकारक दरवाढीविरोधात माण तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसीलदार कार्यालय, दहिवडी येथे आंदोलन करत या दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे, की केंद्र सरकारने शेतकरी, मजूर वंचित घटकांसाठी योग्य तो निधी मंजूर करून न्याय दिला पाहिजे. केंद्र सरकार पेट्रोल दरवाढ करत असल्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. योग्य तो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला पाहिजे. अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करू.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, तालुका अध्यक्ष एम. के. भोसले प्रदेश काँग्रेसचे सचिव दादासाहेब काळे, विजय धट, बाळासाहेब माने, विश्‍वंभर बाबर, बाळासाहेब माने, नकुसाताई जाधव, संजय ढवाण , योगेश भोसले, विष्णू अवघडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!