राज्यपालांकडून एव्हरेस्टवीर सविता कंसवालचे अभिनंदन


दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । मुंबई । मूळच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील लोंथरु गावच्या गिर्यारोहक सविता कंसवाल यांनी जगातील सर्वात मोठे शिखर माऊंट एव्हरेस्ट तसेच पाचवे मोठे शिखर माउंट मकालू यशस्वी सर केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना कौतुकाची थाप दिली.

पंचवीस वर्षांच्या सविता कंसवाल यांनी दिनांक 12 मे रोजी माऊंट एव्हरेस्ट तर 28 मे रोजी मकालू शिखर सर केले. अशा प्रकारे अवघ्या सोळा दिवसांच्या फरकाने दोन मोठी गिरीशिखरे सर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. सविता कंसवाल यांनी सोमवारी राज्यपालांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन आपल्या विक्रमाची माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!