आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन


स्थैर्य, मुंबई, दि.२६: “आपल्या सर्वांच्या लाडक्या, आदरणीय आशाताई या ‘महाराष्ट्र भूषण’ होत्याच, जाहीर झालेल्या राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राजमान्यता, लोकमान्यता लाभलेल्या ‘सूरसम्राज्ञी’ आशाताईंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. सळसळत्या स्वरांचा हा खळखळता झरा असाच अखंड वाहत राहील. आपल्या सर्वांना संगीताचा स्वर्गीय आनंद कायम देत राहील…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह निवड समितीतील मान्यवर सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आशा भोसले यांची ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!