दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात सार्वजनिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी अथवा ध्वनिक्षेपक वापर करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सशर्त परवानगी दिली आहे उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसिबल वाणिज्य क्षेत्रात 65 निवासि क्षेत्रात 55 तर शांतता क्षेत्रात 50 डेसिबल इतका आवाज करण्याची परवानगी देण्यात आली आहे या पेक्षा जास्त तीव्रतेने डॉल्बी वाजल्यास कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीचा मर्यादित वापर करण्याचे पारंपारिक निर्देश देण्याच्या तयारीत जिल्हा प्रशासन होते. मात्र साताऱ्यात लोकप्रतिनिधींनीच डॉल्बीचा हट्ट धरला आहे यंदा राज्य शासनाने गणेशोत्सवा कार्यक्रमांवर कोणतेही निर्बंध न ठेवल्याने डॉल्बीचा सर्रास वापर व्हावा असा आग्रह होऊ लागला आहे साताऱ्यामध्ये डॉल्बी वाजणार की नाही हा विषय ऐरणीवर आला आहे मात्र जिल्हाधिकारी ऋचेश जयवंशी यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देश निश्चित करून तसा अध्यादेश जाहीर केला आहे
या निर्देशानुसार गणेशोत्सव कालावधीत दिनांक 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर यादरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ध्वनिक्षेपक डॉल्बी सिस्टीम चा वापर आवाज गुणवत्तेची मानके सांभाळून करावयाचा आहे. यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये दिवसा 75 डेसिबल रात्री 70 डेसिबल वाणिज्य क्षेत्रात 65 डेसिबल तर रात्री 55 डिसिबल निवासिक क्षेत्रात दिवसा 55 डिसिबल रात्री 45 डेसिबल शांतता क्षेत्रात दिवसा 50 तर रात्री 40 डेसिबल वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
यापेक्षा अधिक गुणवत्तेच्या आवाज मानकांना किंवा उल्लंघनाला कायदेशीर प्रतिबंध करण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. आवाजाच्या मानकांचे उल्लंघन करणारे दोन्ही क्षेपणावर्धक डॉल्बी चालक-मालक धारक तसेच संबंधित गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्यावर नियमानुसार कारवाई पोलीस विभागामार्फत करण्यात येणार आहे असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.