आर्टपार्क रोबोटिक चॅलेंजची सांगता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ मे २०२२ । मुंबई । बेंगळुरू स्थित ना-नफा तत्वावर चालणारी संस्था, एआय अँड रोबोटिक्स टेक्नोलॉजी पार्क (आर्टपार्क)ने बेंगळुरू येथील जेएन टाटा ऑडिटोरियम, आयआयएससी कॅम्पस् येथे आयोजित केलेल्या रोबोटिक्स चॅलेंजची आज सांगता झाली. या स्पर्धेमध्ये रोबोट्सद्वारे विशेषत्वाने वॉशरूम्समध्ये जॅनिटोरियल अर्थात रखवालीचे काम सादर करण्याचे आव्हान स्पर्धकांना देण्यात आले होते. या स्पर्धेसाठी देशभरातून आलेल्या १३४ अर्जांपैकी सेरबेरस, ग्रिफिनडोर्स, गिगा रोबोटिक्स आणि रोबो ज्योथीयंस या चार टीम्स अंतिम फेरीत पोहोचल्या व या फेरीत त्यांनी नाविन्यपूर्ण रोबोट्सचा वापर करून वॉशरूमच्या देखरेखीच्या कामांचे प्रात्यक्षिक दाखवले. ग्रिफिनडोर्सला विजेती टीम घोषित करण्यात आले तर गिगा रोबोटिक्स आणि सेरबेरस टीम्सनी रनर-अपचे स्थान पटकावले.

भारताला जागतिक रोबोटिक्स प्लॅटफॉर्म्स आणि तंत्रज्ञानांच्या क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी रोबोटिक्स परिसंस्थेला आधार देणे, तिची जोपासना करणे आणि सह-निर्मितीला वाव देणे या आर्टपार्कच्या मिशनचा भाग म्हणून चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रोबोट्सनी वॉशरूमच्या जमिनीवर काही कचरा पडला असल्यास तो स्वच्छ करणे आणि त्यानंतर सॅनिटाइस्झ लिक्विड वापरून वॉशबेसिन आणि वॉशबेसिन काउंटर स्वच्छ करणे इतक्यापुरतेच हे आव्हान मर्यादित होते. यात योग्य तिथे सेन्सर्स लावून वॉशरूमचा आणि परिसराचा अचूक नकाशा तयार करणे, दिशा शोधणे, वस्तू उचलणे, मॉपिंग, जागा अचूकपणे ओळखण्यासाठी पर्सेप्शन अल्गोरिदम तयार करणे, जागांचा अंदाज घेणे आणि वॉशरूममधील विविध वस्तूंची दिशा ओळखणे या कामांसाठी रोबोटिक प्लॅटफॉर्म डिझाइन आणि एक मॅन्युप्युलेटर तयार करणे हे प्रमुख चॅलेंज होते.

आर्टपार्कचे सहसंस्थापक आणि सीईओ उमाकांत सोनी म्हणाले, “अलायड मार्केट रिसर्चनुसार सर्व्हिस रोबोटिक्सच्या बाजारपेठेची उलाढाल २१ टक्‍के सीएजीआर इतक्या गतीने २०३० पर्यंत १५३.७ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. खरेतर भविष्यातील रोजगार क्षेत्रात भरभराट साधायची असेल तर एआय आणि रोबोटिक्स कौशल्ये विकसित करणे आत्यंतिक महत्त्वाचे ठरणार आहे. आर्टपार्क रोबोटिक्स चॅलेन्ज या ध्येयाशी मेळ साधते व या क्षेत्राचे शिक्षण घेणा-यांना इथल्या अवकाशामध्ये आपले कौशल्य परखून घेण्यासाठीची व भारतामध्ये प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या समस्यांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याची संधी देऊ करते. या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत आणि या प्रतिसादाच्या बळावर भारतात रोबोटिक्स परिसंस्थेची उभारणी व विस्तार करण्यास मदत करणारी एक खंबीर एआय आणि रोबोटिक्स कम्युनिटी आम्ही तयार करू.“

अंतिम फेरीला विशाल धुपार ( एमडी आशिया साऊथ, एनव्हीडिया), संदीप दिक्षित (हेड, न्यू टेक्नोलॉजी, अदानी पॉवर), प्रणव सक्सेना (चीफ टेक्नोलॉजी अँड प्रोडक्ट ऑफिसर, फ्लिपकार्ट हेल्थटेक), प्रो. प्रदीप्ता बिस्वास (सेंटर फॉर प्रोडक्ट डिझाइन अँड मॅन्युफॅक्टरींग आयआयएससी), उमाकांत सोनी (को-फाउंडर आणि सीईओ, आर्टपार्क), आणि प्रा. भारद्वाज अमृतुर (रिसर्च हेड आणि डिरेक्टर, आर्टपार्क) अशा या उद्योगक्षेत्रातील नेतृत्वस्थानी असलेल्या व्यक्तींची सन्माननीय उपस्थिती लाभली.


Back to top button
Don`t copy text!