श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये श्री साळुंखे अविनाश श्रीरंगराव पर्यवेक्षक यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । बारामती । विद्यालयातील पर्यवेक्षक श्री साळुंखे ए. एस यांचा सेवा पूर्ती समारंभ साजरा करण्यात आला विद्यालयातर्फे मा. प्राचार्य श्री. बी.एन.पवार साहेब व सर्व स्टाफ च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मा. श्री.ए. एस. साळुंखे सर यांनी रयत शिक्षण संस्थेत अनेक वर्ष इंग्रजी विषयाचे अध्यापन केले अत्यंत संयमी, शांत, सहकार्याची भावना असल्यामुळे ते विद्यार्थी व शिक्षक सहकारी यांच्यात लोकप्रिय होते .त्यांना वृक्ष लागवड व संगोपन करणे हा छंद होता सरांच्या सेवापूर्ती समारंभास आजी-माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, विद्यार्थी, मित्रमंडळी, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास मा. श्री. सदाशिव (बापूजी) सातव जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, मा. श्री. संपतराव गावडे साहेब गटशिक्षणाधिकारी बारामती, मा. श्री शरदराव गावडे मा.विभागीय अधिकारी उत्तर विभाग रयत शिक्षण संस्था सातारा, मा. श्री. काकासाहेब सातव कार्याध्यक्ष धो.आ. (कारभारी)सातव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती माननीय श्री सुरजशेठ सातव गटनेते बारामती मा. श्री. दिलीप नाना ढवाण पाटील स्कूल कमिटी सदस्य, मा श्री. राजेंद्र झगडे स्थानिक स्कूल कमिटी सदस्य आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत शिक्षक प्रतिनिधी श्री. जी.आर तावरे सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.तृप्ती कांबळे व संदिपा सोडनवर मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे आभार श्री. जी. एम. तावरे सर यांनी केले


Back to top button
Don`t copy text!