विडणी येथे मारहाण करून रोख रक्कम व दागिने पळविल्याची तक्रार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ६ जून २०२३ | फलटण |
विडणी (ता. फलटण) येथे जुने घर पाडत असताना पाच जणांनी शिवीगाळ करत काठीने मारहाण करून ३० हजार रुपयांची रोख रक्कम व चार तोळ्यांचे गंठण पळवून नेल्याची तक्रार राजेंद्र संपतराव शिर्के (रा. विडणी) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

या प्रकरणी प्रदीप शांतीलाल कासार, ज्योती प्रदीप कासार, रेखा धनंजय कासार, राजकिरण धनंजय कासार, राजेंद्र शंकरराव धुमाळ, मोनिका राजकिरण कासार (सर्व राहणार विडणी, तालुका फलटण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी, दिनांक ०५/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.३० वाजण्याच्या सुमारास विडणी येथे फिर्यादी शिर्के यांचे जुने घर पाडत असताना वरील आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण करून फिर्यादी यांना घरात घुसून मारहाण केली. सदर मारहाणीत फिर्यादी यांच्या खिशामध्ये असलेले तीस हजार रुपये व फिर्यादी यांची भावजय सोनाली हिच्या गळ्यातील चार तोळ्यांचा गंठण आरोपींनी पळवून नेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.

अधिक तपास पोलीस हवालदार एस. एस. अडसूळ करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!