दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२२ । सातारा । महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे उमटलेले पडसाद थांबायचे चिन्ह घेत नाहीत खासदार उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणाची थेट तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे या दोन्ही व्यक्तींना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवण्यात यावे अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे
या निवेदनात नमूद आहे की छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली स्वराज्याचा नंतर अफगाणिस्तानापर्यंत विस्तार झाला त्यांनी समाजात सर्वधर्मसमभावाची भावना रुजवली आणि तोच विचार पण आता पुढे नेत आहोत मात्र काही व्यक्ती महाराष्ट्रात छत्रपतीं शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडवत आहेत . महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायां विषयी वादग्रस्त वक्तव्य करून हा प्रकार घडवून आणला आहे कोषारी यांनी समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते म्हणून त्यांना स्वराज्य स्थापन करता आले असे आशयाचे विधान केले होते त्यावरून छत्रपती शिवरायांचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे कोश्यारी यांनी यापूर्वीही महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल संतापजनक वक्तव्य केले होते ही वक्तव्य त्यांची जाहीर कार्यक्रमा मधली आहेत जनमानसातून निषेध होऊ नये ते स्वतः बदलायला तयार नाहीत त्यांची महाराष्ट्रातील अडीच वर्ष कारकीर्द होऊनही त्यांना शिवराय समजण्याची बाब दुर्दैवी आहे राज्यपाल हे घटनात्मक पद असताना देखील दिवसेंदिवस या पदाची प्रतिष्ठा रसा तळाला गेली आहे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी हे इतिहास संशोधक नाहीत तरी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमान जनक वक्तव्य केले त्याचामिती व निषेध करतो या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोशारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना तातडीने पदावरून दूर करावे आणि तमाम जनतेची मागणी आहे या मागणीवर योग्य ती कार्यवाही होईल अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे.