कॉम्पॅकने स्मार्ट टेलिव्हिजनमध्ये प्रवेश केला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.२:अमेरिकेतील ब्रँड कॉम्पॅक एकेकाळी जागतिक बाजारातील अग्रेसर असा पर्सनल कम्युटिंगमधील
ब्रँड राहिला आहे. कॉम्पॅकने मंगळवारी ओसीफाइड इंडस्ट्रीजच्या लायसनिंग असोसिएशनच्या
माध्यमातून स्मार्ट टेलिव्हिजन लाँचिंगची भारतात घोषणा केली.

ब्रँडने
हेक्स नावाची बहुप्रतिक्षित फ्लॅगशिप क्युएलईडी ४ के सिरीज सुरू करून ब्रँडने पहिला
ठसा उमटवला आहे. हे मॉडेल ५५ इंच आणि ६५ इंचांच्या दोन मोठ्या आकारात असून अनुक्रमे
५९,९९९ रुपये आणि ८९,९९९ रुपयांच्या किफायतशीर किंमतीत उपलब्ध आहेत. यात लाइफ-लाइक
व्हिज्युअल-ऑडिओ अनुभवासाठी अत्याधुनिक डिस्प्ले, नवीन्यपूर्ण साउंड टेक्नोलॉजी समाविष्ट
आहे.

कॉम्पॅक टेलिव्हिजन बिझनेसचे सीईओ आनंद दुबेम्हणाले,
“या लाँचिंगद्वारे, स्मार्ट टेलिव्हिनमधील ग्राहकांना सर्व सेगमेंट आणि साइजमध्ये उत्तम
पर्याय उपलब्ध करून देणारा ब्रँड म्हणून स्थापित करण्याच्या दृष्टीने अनेक पाऊले प्रथमच
उचलली आहेत. कॉम्पॅक हेक्स हे उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि अप्रतिम सुविधांचे विलक्षण डिव्हाइस
आहे. मात्र याचे वेगळेपण दर्शवणा-या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे, प्रत्येक पातळीवर
गुणवत्ता सुनिश्चित करणारे उत्कृष्ट घटक आम्ही त्यात वापरलेले आहेत. तर दुसरे म्हणजे,
हेक्स हा सर्वात आकर्षक टेलिव्हिजन असून तो आपल्या वैयक्तिक मनोरंजनात केंद्रस्थानी
असेल.”

पुढील
काही आठवड्यात ३२ इंच ते ५५ इंचांपर्यंत लहान आकारातील उत्पादने उपलब्ध होतील. त्यातही
ईएसई आणि मिमीसारखी वैशिष्ट्ये असतील.

सर्व
कॉम्पॅक टेलिव्हिजन भारतात तयार केलेले असून १ सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील.”


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!