तिसऱ्या तिमाहीच्या कंपनी निकालांनी दिले अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य , दि.26: वित्त वर्ष २०२०-२१ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी आतापर्यंत आलेल्या कंपनी निकालांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीबाबत चांगले संकेत दिले आहेत. बहुतांश कंपन्यांनी उत्पन्नाच्या प्रकरणात बाजाराच्या अंदाजापेक्षा चांगली कामगिरी केली. आयटीपासून सिमेंटपर्यंतच्या क्षेत्रांनी जोरदार वित्तीय निकाल दिले, ज्याचा परिणाम शेअर्सवरही दिसत आहे.

प्रत्यक्षात तिसरी तिमाही ऑक्टोबरपासून डिसेंबरच्या अवधीत असते. यात मोठ्या प्रमाणात सण असतात. गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळीसारखे बहुतांश सण या तीन महिन्यांत येतात. या काळातील खरेदी शुभ मानली जाते. यामुळे कोविड-१९ महारोगराई आणि लॉकडाऊनच्या झटक्यातून सावण्यात कंपन्यांना बरीच मदत मिळाली. त्यांचा व्यवसाय, उत्पन्न आणि नफा वेगाने वाढत आहे. कमोडिटीच्या किमतीत वेगवान वृद्धी आणि बेस इफेक्ट यामध्ये समाविष्ट आहे.

पुरवठा साखळी बळकट
काही मोठ्या कंपन्या अशा छोट्या कंपन्यांच्या बिझनेसचा १ हिस्सा आपल्या खात्यात जोडण्यात यशस्वी ठरल्या. या कंपन्यांची पुरवठा साखळी कोरोनामुळे विस्कळीत झाली होती. त्यामुळे हॅवेल्सचे उत्पन्न गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ३९% वाढले.

भावासोबत मागणीही वाढली
गेल्या काही महिन्यांपासून पोलाद क्षेत्रासाठी स्थिती वेगाने बदलली आहे. जगात पोलादाच्या किमती वाढल्या आहेत. याशिवाय स्थानिक मागणीही वेगाने वाढली आहे. या कारणामुळे जेएसडब्ल्यू स्टीलचे उत्पन्न २१% वाढले. अल्ट्राटेकचा व्हॉल्यूम १४% वाढला.


Back to top button
Don`t copy text!