कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध : रमेश बाबर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑगस्ट २०२२ । बारामती । कर्मचारीआणि त्यांच्या कुटुंबाच्या उन्नीतीसाठी त्याशिवाय त्यांच्या विविध कार्यासाठी संघटना कटिबद्ध आहे असे प्रतिपादन फेरेरो इंडिया प्रा ली या कंपनी मधील इमसोफर मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लोइज युनियनचे अध्यक्ष रमेश बाबर यांनी केले. युनियनच्या 11 व्या वर्धापन दीना निमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या वेळी रमेश बाबर अध्यक्ष,अमोल पवार सचिव,संदीपकुमार बिचकुले  पाध्यक्ष,प्रविणकुमार थोरात कार्यअध्यक्ष,चंद्रशेखर नाळे खजिनदार,आनंदकुमार जाधव सहसचिव,सचिन पिंगळे सहखजिनदार,संतोष पवार सदस्य,भाग्यश्री माने सदस्या, लक्ष्मी धेंडे सदस्या,रमोला आवळे सदस्या आदी मान्यवर उपस्तित होते. फेरेरो इंडिया प्रा ली मधील एकमेव मान्यता प्राप्त संघटना असून फक्त व फक्त कर्मचाऱ्यांचे हीत हेच आमचे ध्येय असून त्यासाठी विविध नियोजन केल्याचे रमेश बाबर यांनी सांगितले या वेळी संघटनांच्या फलकाचे पूजन करण्यात आले. आभार सचिव अमोल पवार यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!